Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेल आज स्वस्त झालंय, वाचा तुमच्या शहरातले नवे दर एका क्लिकवर

नवी दिल्ली :  पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुस‍ऱ्या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती कमी झाल्यामुळे मंगळवारी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या. मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोल २२ पैशांनी, तर डिझेल २३ पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे.

Advertisement

दिल्लीत आता पेट्रोलची किंमत ९०.५६ रुपये आहे, तर डिझेल ८०.७७ रुपये प्रतिलिटर आहे. देशातील कर आणि स्थानिक करांच्या आधारे (व्हॅट) राज्यांत आणि वाहतुकीच्या खर्चावर आधारित देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत फरक आहे.

Advertisement

मंगळवारी मुंबईतील पेट्रोलचा दर ९७.१९ रुपयांवरून प्रतिलिटर ९६.९८ रुपयांवर घसरला. त्याचप्रमाणे डिझेल ८८.२० रुपयांवरून ८७.९६ रुपये प्रतिलिटरवर घसरले. मागील तीन कपातीनंतर पेट्रोल प्रतिलिटर ६१ पैसे, तर डिझेल ६० पैशांनी प्रतिलिटर स्वस्त झाले आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फेब्रुवारीपासून घसरणीचे वातावरण आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवरही दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Advertisement