Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक ! नृत्य शिक्षकाने विद्यार्थिनीला रंग लावत बळजबरीने दारू पाजली, बेशुद्धावस्थेत नग्न फोटो काढत अत्याचार केले…

महाअपडेट टीम, 31 मार्च 2021 :- डान्स ॲकॅडमीतील नृत्य शिकविणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनीला दारू पाजून अत्याचार केल्याची घटना अजनी हद्दीत घडली. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. रोमियो गजानन गोडबोले (२५, रा. सोमवारी क्वॉर्टर नं. ७४ /२), असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी ही मूळची वर्धा येथील असून तिने नागपुरातून इंजिनीअरिंग केले आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून अजनीतील एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते. तिची इन्स्टाग्रामवरून डान्सर रोमियोशी ओळख झाली.

Advertisement

दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेतले आणि दोघांची चॅटिंग सुरू झाली. दोघांची चांगली मैत्री झाली. तरुणीचाही स्वभाव बेधडक असल्यामुळे रोमियोने तिचा गैरफायदा घेण्याचे ठरविले. त्याने गेल्या काही दिवसांपासून तिला अश्‍लील मॅसेज व फोटो पाठविणे सुरू केले. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. त्याने सोमवारी दुपारी तिला कॉल केला.

Advertisement

तिला घरी पार्टी करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. मित्र असल्यामुळे तिनेही त्याला नकार दिला नाही. दुपारी दोन वाजता रोमियो तिच्या फ्लॅटमध्ये आला. त्याने सोबत दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. त्याने रंग लावला आणि दारू पिण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार देताच तिला मारहाण केली आणि बळजबरीने दारू पाजली. दारू पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली.

Advertisement

दोन तासांनंतर ती शुद्धीवर आली असता ती बेडवर नग्नावस्थेत होती, तर रोमियो तिच्या बेडवर झोपलेला होता. तिने आरडाओरड केली असता रोमियोने तिचे तोंड दाबले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. मोबाइलमध्ये नग्न फोटो काढले असून यानंतर मी आल्यानंतर मला शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

Advertisement

त्यानंतर तो घरातून निघून गेला. तिने घडलेला प्रकार लगेच नागपुरातील नातेवाइकांना सांगितला. त्यांनी वारंवार अत्याचार होण्यापेक्षा पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती नातेवाइकासह पोलीस ठाण्यात गेली.

Advertisement

रोमियोला माहिती मिळताच त्याने हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यात असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला सोबत घेतले आणि अजनी पोलीस स्टेशन गाठले. त्याने तरुणीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांमुळे अजनी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

Advertisement
Advertisement