Take a fresh look at your lifestyle.

दुर्दैवी : खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्राशन केल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

महाअपडेट टीम, 31 मार्च 2021 :- खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्राशन केलेल्या पोलीस कर्मचारी पोपट विष्णू दराडे (वय ४५, रा. अकोले, ता. इंदापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement

येथील तालुका पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. रविवारी (दि.२८) सायंकाळी ही घटना घडली. ड्युटी संपवून घरी गेल्यानंतर दराडे आराम करत होते. त्यांना मागील तीन- चार दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याचे औषध समजून शेतात फवारण्याचे कीटकनाशकच प्राशन केले.

Advertisement

त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना त्रास होऊ लागला. दराडे यांनी घरच्यांना हे औषध पिल्याचे सांगितल्यावर त्यांना कुटुंबातील लोकांनी तत्काळ उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

दराडे हे गेली २४ वर्षे पोलीस सेवेत होते. पुणे शहर, देहू रोड, इंदापूर, बारामती शहर आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Advertisement

दरम्यान, याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण म्हणाले, खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्यायल्याने दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement
Advertisement