Take a fresh look at your lifestyle.

अंधश्रद्धेचा कहर! एकाच वेळी तरुण मुलींसह 35 महिलांच्या अंगात संचारली देवी, अन् पुढे झाले असे काही की… ‘

महाअपडेट टीम, 31 मार्च 2021 :-  अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात विचित्र आणि संतापजनक प्रकार घडला आहे .या शिवरा गावात भुताने झापाटल्याची अफवा पसरवण्यात आली असून गावातील पारधी समाजातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी देवी संचारल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Advertisement

गावातील अनेक महिला आणि तरुण मुलींच्या अंगात येवू लागलं आहे. या सर्व लोकांना भुतानं झपाटलं आहे, असं स्थानिक मांत्रिकाने सांगितल्यानं सर्व वस्ती दहशतीखाली जगत आहे. एवढंच नव्हे, तर हे मांत्रिक अंधश्रद्धेतच्या प्रभावाखाली येऊन भूत उतरण्याच्या नावाखाली संबंधित महिला आणि तरुणींना अमानुष मारहाण केली जात आहे. याची माहिती पारधी समाजातील कार्यकर्ते मतीन भोसले यांना कळल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. मतीन भोसले यांनी या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली.

Advertisement

त्यानंतर अंनिसतर्फे डॉ हमीद दाभोलकर, मतीन भोसले यांनी संबंधित लोकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित लोकांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. मांत्रिकाच्या सांगण्यावरून या गावातील लोकांनी भूत उतरवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विठोबा सावंगी हे ठिकाण गाठलं आहे.

Advertisement

हे ठिकाण अंगातील भूत उतरवण्यासाठी ओळखलं जातं. एकाच वेळी गावातील 30 ते 35 लोकांच्या अंगात येत असल्याने संबंधित प्रकार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित घटनेची माहिती अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी येताना पाहून अंगात येणाऱ्या लोकांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मांत्रिकाने पळ काढला आहे.

Advertisement

या गावात यापूर्वी नरबळी सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आणखी एका नवीन प्रकारामुळे गावात दहशत पसरली आहे. त्यामुळे संबंधित लोकांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या हमीद दाभोळकर आणि मतीन भोसले यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement