Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : शरद पवार यांची तब्येत बिघडली, 31 मार्चला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार !

महाअपडेट टीम, 29 मार्च 2021 :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडा अस्वस्थपणा जाणवत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असून त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं मलिक यांनी सांगितलं.

Advertisement

वैद्यकीय तपासणीनंतर सध्या, कुठलिही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिला आहे. पुढील उपचारासाठी 31 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून  अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल, असं  मलिक यांनी म्हटलं आहे.

Advertisement

त्यामुळे शरद पवार यांना पुढील सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले आहे. त्यांना पश्चिम बंगाललाही प्रचाराला जाता येणार नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी शरद पवार जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे.

Advertisement

खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बाबांना पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला 10 दिवसांसाठी रुग्णालयात एडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील.

Advertisement

त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement