Take a fresh look at your lifestyle.

देशात कोरोनाचं तांडव सुरूच, पाच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका !

महाअपडेट टीम, 28 मार्च 2021 :- देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

Advertisement

शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासांत २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Advertisement

देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचे लसीकरण झाले आहे. ३० जानेवारीला भारतात सर्वात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.

Advertisement

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझिलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

Advertisement
Advertisement