Take a fresh look at your lifestyle.

राज्यात आजपासून कडक जमावबंदी, आज रात्री 8 नंतर काय चालू , काय बंद ? घराबाहेर पडण्यापूर्वी ‘या’ गाईडलाईन वाचा !

महाअपडेट टीम, 27 मार्च 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात तूर्तास तरी लॉकडाऊन लागू होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात आज 27 मार्चपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत.

Advertisement

नव्या गाईडलाईनमध्ये वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळून सर्व खासगी आस्थापनांसाठीही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या आस्थापनांना केवळ 50 टक्के कामगारांना घेऊनच काम करण्यास सांगितलं आहे. कर्माचारी संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

तसेच आस्थापनांच्या ठिकाणी मास्कशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयाच्या गेटवरच कर्माचाऱ्यांचे तापमान चेक करणे, सॅनिटाझर ठेवणे, आदी गोष्टींच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Advertisement

गाईडलाईन्स :-  आज रात्री 8 ते उद्या सकाळी 7 दरम्यान पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Advertisement

सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यास तातडीने जागच्या जागी दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यात मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड तर रस्त्यावर थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

Advertisement

आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील. तसेच हॉटेल, बार, सिनेमागृहसुद्धा रात्री आठ नंतर बंद होतील. परंतु होम डिलिव्हरी सर्व्हिस मात्र सुरू राहणार आहे.

Advertisement

अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार आहे तर लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू, सीटीसी खाणाऱ्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

Advertisement

दुकानं, रेस्टॉरंट, मॉल आदी ठिकाणी ग्राहकांमधील सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही तर कडक कारवाई कारण्यात येणार आहे. एका वेळीपाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देणार नाहीत.

Advertisement
Advertisement