Take a fresh look at your lifestyle.

महिला आरएफओ दिपाली चव्हाणने सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर केलेत ‘हे’ धक्कादायक आरोप

महाअपडेट टीम, 26 मार्च 2021 :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांनी हरीसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती मिळत आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Advertisement

वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात. रात्री – अपरात्री ते भेटायला बोलावतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची देत असत. यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनीही शिवकुमारवर कुठलीच कारवाई केली नसल्याने मी त्यांच्या या त्रासाला कंटाळले आहे.

Advertisement

दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेकला बोलावले होते. आपण गर्भवती असल्याने ट्रेक करु शकत नव्हती, तरी मुद्दामहून तीन दिवस मालूरच्या कच्च्या रस्त्याने फिरविले. यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोटमध्ये महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आला.

Advertisement

काम केल्यानंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला. या आत्महत्येमुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

Advertisement
Advertisement