Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी ! १०वी-१२वी च्या विद्यार्थ्यांची कोरोनामुळे परीक्षा हुकली तर काय आहे पर्याय?, जाणून घ्या, शिक्षणमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

महाअपडेट टीम, 26 मार्च 2021 :- Maharashtra SSC and HSC exam 2021 : सध्या कोरोनाची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावरही मात करुन यंदा दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. काही जिल्ह्यांत लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने तसेच काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांच्यासाठी शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी मोठी माहिती दिली आहे.

Advertisement

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे.

Advertisement

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे.  बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी  ३० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement

1. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार
२. विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.
३. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.
४. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

Advertisement
Advertisement