Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक घटना : डॅशिंग वनपरिक्षेत्र महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

महाअपडेट टीम, 26 मार्च 2021 :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांनी हरीसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

काल (25 मार्च) सायंकळी 5.30 च्या सुमारास त्यानी आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.

Advertisement

घटनास्थळी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती धारणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दिपाली चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

Advertisement

दीपाली ह्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी दिपाली चव्हाण यांचा विवाह राजेश मोहिते यांच्याशी झाला होता. राजेश मोहिते हे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

Advertisement

दिपाली ह्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जायच्या. अवघ्या पाच वर्षांपूर्वीच त्या (2015) साली महाराष्ट्र वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement