Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय ?

महाअपडेट टीम, 25 मार्च 2021 :- काही दिवसांपूर्वी एका तरुणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तरुणाचं हृदय बंद असल्याचं तपासणीत आढळून आलं. तो फक्त उभा होता तरीही असे झाले होते तर, हा हृदयविकार येण्याची काही कारणे आहेत ते जाणून घेऊयात.

Advertisement

व्यायामाची सवय नसताना जर अचानक अतिरिक्त प्रमाणात व्यायाम केला किंवा धावले तर हृदयाची धडधड वाढते.शांत बसलेले असताना हृदय नियमितपणे पंपिंग करत असते.मात्र धावताना हृदयाचे पंपिंग करण्याची गती वाढते.शरीराला लागणाऱ्या रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ह्रदयाचे स्पंदन वाढते.

Advertisement

अशावेळी हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त रक्त वाहून नेतात.अगदी चालत येऊन रक्तदाब मोजला तरी तो जास्त दिसतो.थोडावेळ बसले की नॉर्मल दिसतो.जेव्हा या रक्तवाहिन्या हृदयाला रक्त पुरविण्यास असमर्थ होतात तेव्हाच अटॅक येतो.कधी कधी त्या रक्तवाहिन्या फुटून अंतर्गत रक्तस्रावामुळेही मृत्यू उद्भवू शकतो.

Advertisement

त्यामुळे केव्हाही व्यायामाची सवय नसेल तर धावपळ करू नका.पहिल्या दिवसापासून हळूहळू व्यायाम करण्यास सुरुवात करा. धावणे किंवा जिम करणे या गोष्टी हळूहळू वाढवत चला व्यायाम असो,योग असो अथवा प्राणायाम असोत..या गोष्टी यथाशक्तीच कराव्या.

Advertisement
Advertisement