Take a fresh look at your lifestyle.

राज्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल ३५ हजार ९५२ कोरोनाग्रस्तांची रेकॉर्डब्रेक नोंद, बेळगावने केल्या महाराष्ट्राच्या सीमा बंद !

महाअपडेट टीम, 26 मार्च 2021 :- राज्यात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. आज राज्यात ३५ हजार ९५२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ती आजवरचा हा सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आहे. तर २० हजार ४४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु धक्कादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत १११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडाही चिंतेचा विषय बनला आहे. हा एक आकडा तीन लाखांच्या दिशेने सरकला आहे.

Advertisement

राज्यातील काही दिवसांत विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसून येऊ लागल्याने ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे तब्बल ३५ हजार ९५२ नवीन रुग्ण आढळले असून एका दिवसातील रुग्णसंख्येचा आजवरचा हा सर्वोच्च आकडा ठरला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या प्रमुख महानगरांतील स्थिती सर्वात गंभीर असून एकट्या मुंबईत आज रेकॉर्डब्रेक ५ हजार ५०५ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

Advertisement

मुंबई पाठोपाठ पुणे शहरात आज ( गुरुवार) नव्याने 3286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 47 हजार 629 इतकी असून आज 23 जणांना आपला जीव गमावला लागला आहे.

Advertisement

दुसरीकडे नागपूरमध्ये रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. नागपुरात आज 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात आज 3 हजार 579 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2 हजार 285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रा शेजारच्या राज्यांनाही आता धडकी भरल्याचं पाहावयास मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या सीमा बंद केल्या आहेत. जेसीबीच्या साहाय्याने मातीचे ढिगारे टाकून आणि काटेरी झाडे टाकून हे रस्ते बंद करण्यात येत आहेत.

Advertisement

त्यामुळे मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होतोय. आता वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोणते नवे निर्बंध लागू होतायत का, हे पाहावे लागणार आहे.

Advertisement
Advertisement