Take a fresh look at your lifestyle.

दुर्दैवी घटना ! आईच्या राख सावडण्याच्या दिवशीच मुलाचीही प्राणज्योत मालवली

महाअपडेट टीम, 25 मार्च 2021 :- नियतीचा डाव कधीच कोणाला कळालेला नाही. याचा प्रत्यय साळेगाव (ता.केज) येथे बुधवारी (दि.२४) आला. कोरोनामुळे आईपाठोपाठ लेकाचाही मृत्यू झाल्याने गालफाडे कुटुंबावर मोठा आघात झाला. साळेगाव येथील प्रभाकर बब्रुवाहन गालफाडे (४०) हे अंबाजोगाई येथे स्टेट बँक ऑफ इंडियात खासगी सुरक्षा रक्षक म्हणून रोजंदारीवर काम करत होते.

Advertisement

मागील आठवड्यात बँकेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. प्रभाकर गालफाडे हे सहवासीत असल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान, प्रभाकर यांच्यानंतर त्यांच्या आई कस्तुराबाई गालफाडे यांनाही बाधा झाली. माय-लेक १९ मार्च अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्डात भरती करण्यात झाले होते.

Advertisement

कस्तुरबाई गालफाडे यांचा २२ मार्च रोजी सकाळी आठ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम बुधवारी होता. बुधवारी पहाटे प्रभाकर यांचाही प्राणज्योत मालवली. प्रभाकर गालफाडे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

Advertisement

आईच्या सावडण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच मुलगा प्रभाकर यांच्या निधानाची वार्ता येऊन धडकली. त्यामुळे गालफाडे कुटुंबावर दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोघांना कोरोनाने कायमचे हिरावून घेतल्याने गालफाडे कुटुंबीय शोकमग्न झाले होते.

Advertisement
Advertisement