Take a fresh look at your lifestyle.

‘हे काही गंभीर आरोप नाहीत’; त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते – संजय राऊत

महाअपडेट टीम, 24 मार्च 2021 :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असताना दिल्लीतही या प्रकरणावरुन वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळालं आहे.

Advertisement

खासदार नवनीत राणा या प्रकरणावरून आक्रमक झाल्या होत्या. यांनतर मध्यंतरात खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार म्हटलं आहे.

Advertisement

यावर अरविंद सावंत यांनीही हा आरोप फेटाळून लावला आहे. नवनीत राणा यांनी माझ्यावर केलेला आरोप पूर्णपणे खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं यांत तथ्य नाही. उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?, असा खुलासा अरविंत सावंत यांनी केला आहे.

Advertisement

आता यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते, असे सांगत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे.

Advertisement
Advertisement