Take a fresh look at your lifestyle.

मन हेलावणारी घटना ! ऑटो रिक्षा आणि बसची भीषण धडक, 12 अंगणवाडी सेविकांसह 13 जणांचा मृत्यू

महाअपडेट टीम, 23 मार्च 2021 :- मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेरमधील ओल्ड कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशन परिसरातील आनंदपूर ट्रस्ट समोर ऑटो आणि बसच्या धडकेत 13 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये 12 महिला आणि रिक्षा चालकाचा समावेश आहे. 

Advertisement

या सर्व महिला अंगवणाडीच्या मुलांसाठी शाळेमध्ये पोषण आहार बनवण्यासाठी जात होत्या. ही माहिती मिळताच ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनीही पीएम हाऊस येथे जाऊन मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची भरपाई रक्कम जाहीर केली आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, मृत महिला या अंगणवाडीसाठी भोजन बनवत असत. त्या सर्वांनी आपले काम संपवून दोन ऑटो रिक्षातून घरी परतत होत्या परंतु एक ऑटो रिक्षा वाटेतच खराब झाल्याने सर्वजण एकाच रिक्षात बसले.

Advertisement

ऑटो रिक्षा रस्त्यानी जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या बसने ऑटोला अक्षरशहा फरफटत नेले. ही घटना इतकी भयंकर होती कि यात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांना चक्का जाम केलं आहे तसंच बस चालकाच्या अटकेची मागणी केली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासोबतच जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement