Take a fresh look at your lifestyle.

Pune Market Yard | बटाटा, कांदा, लसणाच्या दरांत घसरण, तर ‘ह्या’ भाज्यांना दरांत वाढ

महाअपडेट टीम, 22 मार्च 2021 :- बदलते वातावरण, पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. परंतु स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाटा, शेवग्याच्या दारांत आवक वाढल्याने घसरण झाली आहे. मटारच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

Advertisement

मार्केट यार्डात रविवारी मेथी, चाकवत, अंबाडी आणि पालकच्या दरांत वाढ झाली असून, शेपू आणि चवळईच्या दरांत घट झाली आहे. कोथिंबीर, कांदापात, करडई, पुदिना, मुळे, राजगिरा, चुका आणि हरभरागड्डीचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डात कोथिंबिरीच्या दीड लाख ३० हजार जुड्यांची आणि मेथीच्या ५० हजार जुड्यांची आवक झाली. मेथीच्या दरात घाऊक बाजारात गड्डीमागे तीन रुपये, अंबाडी दोन रुपये, चाकवत आणि पालक प्रत्येकी एक रुपयाने महागली आहे.

Advertisement

संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि लिंबाच्या दरांत वाढ झाली असून, डाळिंब आणि खरबूजाच्या दरांत घट झाली आहे. अननस, पपई, चिकू, स्ट्रॉबेरी आणि पेरूचे दर स्थिर आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने थंडगार फळांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या दरात किलोमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

आवक जास्त झाल्याने खरबुजाच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी घट झाली आहे. संत्र्यांच्या दरात ४० टक्क्यांनी, तर मोसंबी २० टक्क्यांनी महागली आहे. लिंबाच्या दरात गोणीमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. डाळिंबाची आवक वाढल्याने दरात १० ते २० टक्यांनी घट झाली.

Advertisement
Advertisement