Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना खासदाराची नवनीत राणांना धमकी, “तू महाराष्ट्रात कशी फिरतेस ते पाहतोच, आणि…”

महाअपडेट टीम, 22 मार्च 2021 :- संसदेत सोमवारी परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद उमटले असल्याचं पाहायला मिळाले. अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा आणि भाजपचे खासदार गिरीश बाटप महाविकास आघाडीवर टीका करत राष्ट्रपती लागवडीची मागणी केली असल्याने शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सभागृहाच्या बाहेर एनआयए या वृत्तवाहिनीशी बोलताना राणा यांनी शिवसेनवर चांगलच तोंडसुख घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या म्हणाल्या की, अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात धमकावलंय, यापूर्वीही शिवसेनेकडून माझ्या चेहऱ्यावर एसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे राणा यांनी सांगितले.

Advertisement

आज ज्या प्रकारे अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे.

Advertisement

त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, दिल्ली पोलीस आयुक्त यांना निवेदन देत खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement