Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का ?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच मोठं विधान

महाअपडेट टीम, 22 मार्च 2021 :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही वाढती रुग्णसंख्या धोक्याची आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनबाबत पत्रकारांशी संवाद साधला असता मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठल्यानं चिंता वाढली आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये रुगसंख्येत खूपच वाढ होताना दिसून येत आहे.

Advertisement

रुग्णसंख्या जास्त वाढणाऱ्या काही शहरांत लॉकडाऊन करावं लागेल किंवा रुग्णवाढीचा दर असाच अधिक कालावधी राहिला तर काही शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Advertisement

राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. परंतु कोरोनाबाबत घाबरायचं काही कारण नाही, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही. मात्र लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे’, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले. आता जिथे निवडणुका सुरू आहेत, गुजरातमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत तिथे गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होत नाहीये. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Advertisement

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ३ लाख जणांना दररोज लसीकरण राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहेत. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जे लक्षणविरहीत रुग्ण आहेत, त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे.

Advertisement
Advertisement