Take a fresh look at your lifestyle.

India vs England ODI Series : इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल, पहा व्हिडीओ

महाअपडेट टीम, 22 मार्च 2021 :-  भारताने इंग्लंडला कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभूत केलं असताना आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. 23 मार्चपासून या वनडे मालिकेला सुरुवात होणार असून या मालिकेतील सर्व सामने हे पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल झाली आहे.

Advertisement

याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडिया पुण्याला पोहचल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Advertisement

Advertisement

इंग्लंड संघाची भारत दौऱ्यामधील ही शेवटची मालिका असणार आहे. भारताने याआधी इंग्लंडला कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभूत केलं आहे. त्यामुळे ही एकदिवसीय मालिका जिंकण्याचा मानस पाहुण्या इंग्लंडचा असणार आहे.

Advertisement

तर ही वनडे मालिका जिंकून तिन्ही फॉर्मेटमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. दरम्यान नुकतीच या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची 14 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 राखीव खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

Advertisement

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंग्लंड :- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड

Advertisement

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :-
23 मार्च, पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
26 मार्च, दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
28 मार्च, तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

Advertisement
Advertisement