Take a fresh look at your lifestyle.

पत्नीच सोडून जाणं सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या जिव्हारी लागलं, काही काळातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला !

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- जन्मभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतलेली पत्नी कोविडच्या आजाराने सोडून गेली. ही बाब उत्तरार्ध घालत असलेल्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या जिव्हारी लागला आणि काही काळातच त्यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला. शंकर पांडुरंग निंबाळकर त्यांचे नाव. पत्नीपाठोपाठ अवघ्या ४८ तासांत त्यांचा अकाली झालेला मृत्यू खापरखेडावासीयांना चांगलाच चटका लावून गेला.

Advertisement

शंकरराव हे महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे मुख्याध्यापकपदी होते. त्यांच्या अध्यापन कौशल्याने ते काही काळातच लोकप्रिय झाले होते. त्यांच्या याच कार्याची दखल देशाचे बहुजन राष्ट्रपती के.आर.नारायण यांनी घेतली होती व त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेे.

Advertisement

त्यांच्या पत्नी अलकनंदा निंबाळकर यांचे सोमवारी (१५ मार्च) कोविडच्या आजाराने निधन झाले. त्यावेळी निंबाळकर यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना पत्नीच्या निधनाची माहिती देण्यात आली नाही. परंतु, बुधवारला त्यांना पत्नीच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांना ही बाब असह्य झाली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांना हृदयघाताचा तीव्र धक्का आला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

४७ तासांत निंबाळकर कुटुंब दोन ज्येष्ठ जीवांना मुकले. त्यांच्या मृत्यूची बातमी शैक्षणिक क्षेत्रासह सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यांना ५ सप्टेंबर १९९९ ला राष्ट्रपती के.आर. नारायण यांच्या हस्ते आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

Advertisement

त्यांच्या अध्यापन छायेत घडलेल्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली आहे. शिस्तप्रिय, सहकार्यभाव जपणारे शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. महालक्ष्मी जगदंबा कोराडी देवस्थान येथेही ते व्यवस्थापक होते. वनराई क्षेत्रात भरीव कार्यसुद्धा त्यांनी केले होते.

Advertisement
Advertisement