Take a fresh look at your lifestyle.

स्मशानभूमीत माणुसकी हरवली ! कोरोना पॉझिटिव्ह वृद्धेचे पीपीई किट उघडून कटरने दागिने ओरबाडले !

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धेचा गुरुवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अंगावरील दागिने काढण्यासाठी थेट मृतदेहाचे पीपीई किट उघडून कटरच्या साह्याने अंगावरील दागिने काढल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे गावकऱ्यांकडून संतापजनक प्रक्रिया उमटू लागल्या आहेत.

Advertisement

सविस्तर घडलं असं की, जळगाव शासकीय रुग्णालयात या वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारपर्यंत वृद्धेचे अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी घरी, रुग्णालयात पोहाेचले.

Advertisement

दरम्यान तिच्या अंगावर काही दागिने असल्याने शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी ही बाब वृद्धेच्या नातेवाइकांच्या लक्षात आणून दिली; परंतु, आता वृद्धेचा मृत्यू झालेला असल्यामुळे तिच्या अंगावरील दागिने तिच्या सोबतच जाऊ द्या, असा निर्णय कुटूंबातील काही सदस्यांनी घेतला. त्यानुसार काही वेळातच वृद्धेच्या मृतदेहावर पीपीई किट चढवला.

Advertisement

त्यानंतर मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करून नेरीनाका येथील स्मशानभूमीत नेण्यात आला.त्यानुसार काही वेळातच वृद्धेच्या मृतदेहावर पीपीई किट चढवला. त्यानंतर मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करून नेरीनाका येथील स्मशानभूमीत नेण्यात आला.

Advertisement

अंत्यसंस्कार सुरू होणार तेवढ्यात वृद्धेचा एक जवळचा नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचला. त्याने वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांच्या विषयावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.

Advertisement

दरम्यान, या नातेवाइकाने थेट पीपीई किटमधून वृद्धेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर कटर मागवून वृद्धेच्या अंगावरील दागिने कटरने ओरबाडून बाहेर काढले. सुमारे अर्धा तास हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित नातेवाईकाला अनेकांच्या संतापाचे शिकार बनावे लागले पण त्याने निगरगठ्ठपणे हा सर्व प्रकार सहन करून दागिने ताब्यात घेतले.

Advertisement
Advertisement