Take a fresh look at your lifestyle.

ऐकावं ते नवलच ! शिक्षिकेने ट्यूशनच्या बहाण्याने 13 वर्षांच्या मुलाला बंदी बनवलं, त्याच्याशी जबरदस्ती लग्नही केलं, एवढ्यावरच न थांबता सुहागरात…’

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- कुंडीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी शिक्षिकेने 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता सुहागरात आणि हिरवा चुडा फोडत विधवा झाल्याचं नाटक देखील केलं. पंजाबमधील जालंधर शहरातील बस्ती बावा खेल परिसरात ही घटना घडली असून या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

सदर मुलाला ट्यूशनच्या बहाण्याने घरी बोलावले गेले आणि तब्बल एक आठवडाभर तिथे त्याला बंधक म्हणून ठेवले गेले. सदर मुलाने आपल्या घरी जाऊन हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, जालंधरच्या बस्ता बावा खेल या भागातील आहे. या शिक्षिकेचे लग्नाचे वय झाले तरी तिचे लग्न जुळत नव्हते. तेव्हा कुण्या पंडिताने तिला सांगितले की तिच्या कुंडलीत मंगळाचा दोष आहे ज्यामुळे तिचे लग्न ठरत नाही. हा दोष दूर करण्यासाठी तिला एका कमी वयाच्या मुलाशी सांकेतिक विवाह करावा लागेल.

Advertisement

म्हणून त्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या घरात ६ दिवसांसाठी कैद केले होते आणि त्याच्याबरोबर लग्नाचे ढोंग केले. त्या सहा दिवसांच्या दरम्यान, हळद-मेहंदीचे विधीदेखील करण्यात आले. इतकंच नाही तर, सुहागरात्रीच्या नियोजनाचे नाटकदेखील केले. त्यानंतर या तरुण शिक्षिकेने आपल्या हातातील चुडा फोडून विधवा होण्याचे नाटक रचले आणि अप्रत्यक्षपणे नवरा मेल्याचे दाखवून त्याच्या मृत्यूचेही नाटक केले.

Advertisement

सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात आलं. त्याने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार शिक्षिकेने आणि तिच्या घरच्यांनी बालकाकडून घरातील कामंही करुन घेतली. विद्यार्थ्याच्या संतप्त कुटुंबीयांनी बस्ती बावा खेल पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी शिक्षिका आणि ज्योतिषाने पोलिस स्थानकात येऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी तक्रारही मागे घेतली. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

यावर जालंधरचे डीएसपी गुरमीत सिंह यांनी सांगितले की, लग्न प्रतिकात्मक असले, तरी अल्पवयीन बालकासोबत विवाहविषय कृत्य करणं बेकायदेशीर आहे, कुटुंबीयांच्या सहमतीविना अल्पवयीन बालकाला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे अपराध आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement