Take a fresh look at your lifestyle.

IND vs ENG : मागील 5 मॅचमध्ये राहुल फेल, ही आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल की शिखर धवनवर खरंच अन्याय झालाय !

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- IND vs ENG t20 series 2021 : लोकेश राहुल हा सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला भारतीय संघात स्थान दिलं जात आहे. परंतु दुसरीकडे राहुलला संधी देताना मात्र सलामीवीर शिखर धवनवर विराट कोहली एक कर्णधार म्हणून अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

राहुल आणि धवन यांची मधील पाच सामन्यांमधील आकडेवारी पहिली तर त्यामध्ये शिखर धवन हा नक्कीच राहुलपेक्षा उजवा ठरत आहे. पण असे असून देखील कर्णधार कोहलीने राहुलला चारही सामन्यांमध्ये खेळवले आहे, पण धवनला मात्र एका सामन्याच्या अपयशानंतर संघातून डच्चू दिला आहे.

Advertisement

गेल्या पाच डावांमध्ये पाहिले तर राहुल हा तब्बल तीनवेळा शून्यावर, एकदा एका धावेवर बाद झाला असता राहुलला चौथ्या सामन्यात संधी मिळणार नाही, असे वाटत होते. परंतु राहुलला पुन्हा एकदा चौथ्या सामन्यात संधी दिली आणि तो पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात राहुलला १४ धावांवर समाधान मानावे लागले होते.

Advertisement

याउलट मागील पाच डावांमध्ये धवनने दोन अर्धशतके लगावली आहेत. परंतु लोकेश राहुलला पाच डावांमध्ये मिळून साध्या ५० धावाही करता आल्या नाहीत. राहुलच्या खात्यात पाच डावांमध्ये फक्त १५ धावा आहेत. धवनने सिडनी येथे झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यापूर्वी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात धवनने अर्धशतक पूर्ण केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धववने चार तर राहुलने एक धाव केली होती. तरीही एकच सामना खेळवत त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement