Take a fresh look at your lifestyle.

IND vs ENG: BCCI कडून वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, प्रथमच मिळाली ‘या’ दोन खेळाडूंना संधी

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :-  India vs England ODI Series : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेत प्रथमच सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांची वनडे संघात निवड झाली आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचीही या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे, ज्याने टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार प्रदर्शन केले.

Advertisement

पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळालं :-  इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे. वास्तविक, बुमराहचे नुकतेच लग्न झाले आहे आणि अशा परिस्थितीत त्याला वन डे संघात न निवडणे स्वाभाविक होते. बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये पाच वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यात भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement