Take a fresh look at your lifestyle.

कोरोना बळींच्या तुलनेत रस्ते दुर्घटनांमध्ये अधिक लोकांचा मृत्यू – गडकरी

महाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत वाढत्या रस्ते दुर्घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली. गत वर्षभरात कोरोना महामारीतील बळींच्या तुलनेत रस्ते दुर्घटनांमध्ये अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सरकार अपघातांविषयी अतिशय गंभीर आहे. रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी आवश्यक ती सर्व पाउले उचलावी लागतील, असे स्पष्ट करत या दिशेने काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

गत वर्षभरात कोरोना महामारीचे १.४६ लाख बळी गेले. त्या तुलनेत याच कालावधीत रस्ते अपघातामुळे तब्बल दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागले. यापैकी बहुतांश जण हे १८ ते ३५ वयोगटातील होते, असे गडकरी यांनी यावेळी नमूद केले.

Advertisement

जागतिक बॅंकेच्या ताज्या अहवालानुसार जागतिक पातळीवर रस्ते अपघाताच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. दरवर्षी देशात होणाऱ्या ४.५ लाख रस्ते अपघातांमध्ये दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात तर साडेचार लाख लोकांना अपंगत्वाचा सामना करावा लागतो.

Advertisement
Advertisement