Take a fresh look at your lifestyle.

२७ नगरसेवक फ़ुटलेच कसे? खडसे म्हणाले, 15 तुमचे आहेत, 25 माझ्याकडे येतील आणि….’ वाचा पुढील घटनाक्रम

महाअपडेट टीम, 18 मार्च 2021 :- जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता खालसा झाली आहे. आणि इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन ४५ मतांनी जळगाव महापालिकेच्या महापौरपदी आल्या आहेत. शिवसेनेने भाजपाकडून महापालिकेची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असं असताना देखील हे सत्तांतर कसं घडलं ते आपण जाणून घेऊया.

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना 8-10 दिवसांपूर्वी काही कामानिमित्त फोन केला होता.त्यांनी जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दूरवस्था, रखडलेली विकास कामे त्यामुळे नगरसेवकांवर लोकांची नाराजी पसरली आहे. अशा परिस्थितीत जनता वेठीस धरत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करावा, असं मी मुख्यमंत्र्यांना सुचवले.

Advertisement

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, येत्या 15 दिवसात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भाजपचे 25 नगरसेवक माझ्याकडं येतील आणि तुमचे 15 तर आहेतच. एमआयएमचे 3 नगरसेवक आधीच आलेले आहेत. असं मी मुख्यमंत्र्यांना म्हटले असता त्यांनी विनायक राऊतांशी चर्चा करुन तुम्ही ठरवा, असे सांगितले.

Advertisement

त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी नाथाभाऊंना फोन करुन सत्तांतराबाबत चर्चा केली, त्यानंतर, उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी सोपवली आणि त्यानुसार एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये संवाद झाला.

Advertisement

हे बंडखोर 30 नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसापासून ठेवले होते. इथूनच ऑनलाईन पद्धतीने मतदान पार पडले. या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.

Advertisement
Advertisement