Take a fresh look at your lifestyle.

Breaking : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन

महाअपडेट टीम, 17 मार्च 2021 :- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते.

Advertisement

गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता कोरोनाचे निदान झाले होते.

Advertisement

काल त्यांचा कोरना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वास घेण्यास जास्त त्रास होत असल्याने काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Advertisement

दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख यांच्याकडून गांधींना पराभवाचा धक्का बसला होता.पुढे 2009 आणि 2004 सारी ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले होते.

Advertisement

1999 ते प्रथम खासदार झाले, 2019 ला त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून सुजय विखे यांना उमेदवारी दिली, मात्र दिलीप गांधी यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षाचं काम अविरत केलं.भारतीय जनता पक्षाच्या विविध शाखात त्यांनी काम केलं. नगरपालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्षपद, नगर अर्बन बँकेचे अध्यक्षपद आदी पदे त्यांनी भूषविली होती.

Advertisement
Advertisement