Take a fresh look at your lifestyle.

बबिता फोगटच्या बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

महाअपडेट टीम, 17 मार्च 2021 :- भारतीय कुस्तीपटू धाकड गर्ल बबिता फोगटच्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बबिताची मामेबहीण रितिकाने महाबीर फोगट यांच्या गावातील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे कुस्तीच्या फायनल मॅचमध्ये पराभूत झाल्याने निराश झालेल्या बबिताच्या मामे बहिणीने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

१५ मार्च रोजी सोमवारी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगाट येथील बलाली गावातील घराच्या खोलीत पंख्याला गळफास घेत तीने आत्महत्या केली.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिताच्या बहिणीने राजस्थान येथील भरतपूर मधील लोहागड स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरिय सब ज्युनिअर, ज्युनिअर महिला, पुरुषांची कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा १२ ते १४ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

Advertisement

१४ मार्च रोजी कुस्ती स्पर्धेची फायनल मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये बबिताची मामे बहिण एका पॉईंटने पराभूत झाली. या पराभवाचा तिला खूपच मोठा धक्का बसला होता आणि ती नैराश्यात होती. १५ मार्च रोजी रात्री ११च्या सुमारास बलाली येथील गावात मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Advertisement
Advertisement