Take a fresh look at your lifestyle.

२४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास मिळाली परवानगी, कायद्यातील दुरुस्तीचे विधेयक संसदेत मंजूर

महाअपडेट टीम, 17 मार्च 2021 :- केंद्र सरकारने गर्भपाताची मर्यादा २० आठवड्यांवरून २४ आठवडे करण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी राज्यसभेने मंजूर केले. काही विशेष प्रकरणांमध्येच २४ आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी या प्रस्तावित कायद्याने मिळणार आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वैद्यकीय पद्धतीने गर्भपातासाठीच्या कायद्यातील दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी मांडले. या विधेयकावर आधीच भरपूर चर्चा झालेली आहे. अनेक वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित आहे. गेल्यावर्षी लोकसभेने एकमताने हे विधेयक मंजूर केले होते.

Advertisement

जगभरातील कायद्यांचा अभ्यास करून हे विधेयक तयार करण्यात आले असून राज्यसभेने देखील एकमताने ते मंजूर करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाचे समर्थन केले, तर काँग्रेसने हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली. सरकारचा उद्देश चांगला असला तरी प्रस्तावित कायद्यात अनेक त्रुटी असल्याने ते प्रवर समितीकडे पाठवण्यात यावे, असे विरोधकांचे म्हणणे होते.

Advertisement

मात्र विरोधकांच्या मागण्या फेटाळून लावत ध्वनीमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. या प्रस्तावित कायद्यामुळे काही विशेष प्रकरणांमध्ये २६ आठवड्यांपर्यंतचा गर्भ पाडता येऊ शकतो. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भपाताची परवानगी आहे. बलात्कारातून झालेली गर्भधारणा किंवा शारीरिक व्यंग असलेला गर्भ पाडण्यासाठी अनेकदा पीडितांना न्यायालयात धाव घ्यावी लागते.

Advertisement
Advertisement