Take a fresh look at your lifestyle.

विकृतीचा कळस ! अल्पवयीन मुलीला नशेचं औषध देऊन ते १५ जण तब्बल ९ दिवस करत होते सामूहिक बलात्कार

महाअपडेट टीम, 16 मार्च 2021 :- १५ वर्षीय मुलीवर १५ ते २० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना राजस्थानमधील हाडौती परिसरात घडली आहे. या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यांनतर ९ दिवसांपर्यंत सुमारे दीड डझन तरूणांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिला नशेची औषध देऊन अनेकदा सामूहिक बलात्कार केला.धक्कादायक बाब अशी की या भयंकर कृत्यात एका महिलेचाही समावेश आहे.

Advertisement

पीडित मुलीच्या कुटूंबाचा आरोप आहे की, मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रार दिली पण प्रत्येक वेळी त्यांना पोलिसांनी हाकलून लावले. परंतु आता जेव्हा हा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतंय.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, ही हृदयद्राक घटना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली. 25 फेब्रुवारी रोजी कोटा (ग्रामीण) येथील सुकेत पोलिस स्टेशन परिसरात आरोपी चौथमल, बुलबुल आणि पूजा जैन यांनी तिला दुचाकीवर बसवून बॅग देण्याच्या बहाण्याने झालावाड जिल्ह्यात घेऊन गेले. तेथे ओळखीच्या तीन-चार मुलांकडे तिला सोडले. पीडितेला पहिल्या दिवशी गागरोन येथील किल्ल्यावर घेऊन गेले. तेथून पुन्हा झालावाडमध्ये एका खोलीत डांबले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.

Advertisement

अत्याचार केल्यानंतर वेदनेने विव्हळणाऱ्या बालिकेला ते नशेची औषधे द्यायचे. तिला मारहाणही करायचे. घरी जाऊ देण्याविषयी बोलल्यावर आरोपी तिला चाकूचा धाक दाखवायचे, अशी माहिती उघड झाली आहे.

Advertisement

कोटा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शरद चौधरी यांच्या माहितीनुसार, गागरोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ५ मार्चला आरोपी महिला बुलबुल आणि पूजा तिला झालावाडच्या सुकेतमध्ये घेऊन आल्या. दुसऱ्या दिवशी पीडिता आपल्या आईला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात गेली.

Advertisement

तिथे तिने आपबीती सांगितली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. चौधरी यांच्या माहितीनुसार, प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू केली. विविध पथके नेमली. आतापर्यंत चार अल्पवयीन मुलांसह २० जणांना अटक केली.

Advertisement

शाहरुख, राजा खान, चौथमल, अरशद अयूब, तोशिब, शाहरुख, बिट्टू उर्फ वारिश, नब्बू उर्फ नवाब, इंसाफ मोहम्मद, समीर अब्बासी, आफताब मजिद उर्फ छोटू, मोहम्मद कैफ, मोनू हाड़ा और पूजा उर्फ बुलबुल जैन अटक केलेलया आरोपींची नावे आहे.

Advertisement
Advertisement