Take a fresh look at your lifestyle.

दोन हजार रुपयांची नोट होणार बंद ? गेल्या दोन वर्षांपासून छापली नाही एकही नवी नोट, वाचा संसदेत काय म्हणाले अनुराग ठाकूर

महाअपडेट टीम, 16 मार्च 2021 :- मागील दोन वर्षांपासून देशात २,००० रुपयांच्या नोटचे मुद्रण करण्यात आले नाही, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेत दिली आहे. देशात २००० च्या नोटचा वापर कमी प्रमाणावर होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आगामी काळात ही नोट बंद करणार काय ? अशी चर्चा रंगली आहे.

Advertisement

२००० रुपयांच्या चलनी नोटबाबत लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकू र यांनी लिखित उत्तर दिले आहे. यात ते म्हणतात की, ३० मार्च २०१८ रोजी देशभरात २,००० रुपयांचे ३३६ कोटी रुपये चलनात होते.

Advertisement

त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत हीच संख्या २४९ कोटींवर आली आहे. एखाद्या विशिष्ट मूल्याची नोट छापण्याचा निर्णय हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय घेत असते.

Advertisement

यात जनतेचे व्यवहार पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते; परंतु २०१९-२० आणि २०२०-२१ या काळात २,००० रुपयांची नोट छापण्याचे आदेश देण्यात आले नाहीत, असे अनुराग ठाकूर यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले. त्यामुळे देशात दोन हजारांची नोट बंद होणार असल्याचा कयास लावला जात आहे. उल्लेखनीय बाब अशी की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३५४ कोटी रुपयांच्या नोटांची छपाई झाली होती.

Advertisement

त्यानंतर २०१७-१८ मध्ये अवघ्या ११ कोटींच्या चलनी नोटा छापण्यात आल्या. पुढे २०१८-१९ मध्ये त्याहून कमी म्हणजेच ४.६६९ कोटींच्या नोटांचे मुद्रण झाले. मात्र एप्रिल २०१९ नंतर नोटांची छपाई करण्यात आली नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement