Take a fresh look at your lifestyle.

आसाम : जनतेची काँग्रेसलाच पसंती, काँग्रेस १०० जागा जिंकेल – भूपेश बघेल

महाअपडेट टीम, 15 मार्च 2021 :- आसाम राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागा जिंकत बहुमताने सत्ता पादाक्रांत करणार आहे, असा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रविवारी केला. भाजपकडे आसामच्या विकासाचा कोणताही अजेंडा नाही. केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेला भुरळ घालण्यात भाजप व्यस्त आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Advertisement

आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भूपेश बघेल यांनी दिब्रुगड येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी भाजपवर चौफेर हल्ला चढवत ते म्हणाले की, भाजपने गत पाच वर्षांत आश्वासनपूर्ती केली नाही. त्यामुळे जनतेचा भाजपपासून मोहभंग झाला आहे. आता आसामची जनता काँग्रेसला पसंती देणार आहे. राज्याच्या १२६ पैकी १०० जागा जिंकून काँग्रेस सत्ता पादाक्रांत करणार आहे, असा दावा बघेल यांनी केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे आसाम काँग्रेसचे विशेष पर्यवेक्षक आहेत.

Advertisement

भारत-बांग्लादेश सीमा सील करणे व ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधण्याचे भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे. मागील पाच वर्षांत याबाबत प्रत्यक्षात काहीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. यावरून भाजपकडे कोणताही विकासाचा अजेंडा नाही हे यावरून सिद्ध होत आहे, असा टोला बघेल यांनी लगावला. आसाम राज्यात भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही.

Advertisement

सर्वानंद सोनोवाल की हिमंता बिश्वशर्मा यांच्या गोंधळात भाजप अडकली आहे, अशी टीकासुद्धा त्यांनी केली. आसामात भाजपने कोळसा पुरवठा व सुपारीच्या व्यवसायात प्रचंड भ्रष्टाचार केला. या माध्यमातून भाजपने स्वत:च्याच तिजोऱ्या भरल्या, असा आरोपही भूपेश बघेल यांनी केला.

Advertisement
Advertisement