Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सिनेमाची कथा चोरीप्रकरणी कंगना राणावतवर गुन्हा दाखल

महाअपडेट टीम, 15 मार्च 2021 :-  चित्रपटाची कथा चोरणे, हा प्रकार फिल्म इंडस्ट्रीत नवा नाही. परंतु सध्या सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत आणखी एका वादात अडकली आहे. लेखकाची कथा चोरल्याप्रकरणी कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतर्गत या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Advertisement

१४ जानेवारीला तिने ‘मणिकर्णिका रिटर्न्स-द लिजेंड ऑफ दिद्दा’ चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘दिद्दा- द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’चे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

चित्रपटासाठी माझ्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे म्हणत कंगना आणि तिच्या टीमला नोटीस पाठवली होती. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगना राणावत, बहीण रंगोली, भाऊ अक्षय आणि चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांच्याविरुद्ध खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

याबाबत आशिष कौल एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, जानेवारी महिन्यात मी कंगनाला आणि चित्रपट निर्मात्यांना कथा चोरल्याप्रकरणी नोटीस पाठवली. त्या नोटीसला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

Advertisement
Advertisement