Take a fresh look at your lifestyle.

BABY HEALTH : लहान मुलांना रोज चांदीच्या भांड्यात जेवू घाला, ‘हे’ फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

महाअपडेट टीम, 15 मार्च 2021 :- हिंदू धर्मामध्ये चांदीला पवित्र मानलं आणि खूप शुभ जाते. चांदी हा एक असा धातू आहे ज्यात जेवण केल्यानं व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात. चांदीच्या धातुमध्ये उष्णता विरोधी गुणधर्म असतो चांदी ही शरीरासाठी थंड असते चांदीचे विविध दागिने बनवून आणि त्यांच्या वापराने आपण बरेचसे आजार दूर ठेवू शकतो.

Advertisement

महिलांमधील अनेक समस्या दूर करण्याचं काम चांदी करते, पायात चांदीचे पैंजण जोडवे कंबरेत कडदोरा दंडात बाजूबंद घातल्याने टाचदुखी गुडघ्यांचे आजार कंबरेचे आजार पाय दुखणे हिस्टीरिया अशा वेगवेगळ्या आजारांपासून आपण स्वतःचा बचाव होतो. पहिल्याच्या काळात लोकं चांदीच्या ताटात किंवा केळीच्या पानावर जेवण करत होते, त्यामुळे ते अगदी फिट राहायचे.

Advertisement

आपण लहान मुलांना चांदीच्या ताटात जेवू घातल्यानं त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्या पद्धतीनं होतो. बाळाला अनेक आजारांपासून आपण यामुळे दूर ठेवू शकतो. चांदीच्या भांड्यात लहान बाळाला जेवू घातल्यानं पोटदुखी, डायरियासह पोटाशी निगडित इतर आजार दूर होतात.

Advertisement

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ज्यामुळे मुलं खूप लवकर आजारी पडतात. चांदीच्या भांड्यात खाऊ घातल्यानं या धातूचे काही अंश जेवणात मिसळतात, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मुलं स्वस्थ राहतात.

Advertisement

चांदीला शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. यात अँटी मायक्रोबिअल गुण असतात. चांदीच्या भांड्यात मुलांना खाऊ घातल्यानं रोगांपासून त्यांचं रक्षण होतं. शरीरात संक्रमण होत नाही.

Advertisement

चांदी हा एक थंड धातू आहे. चांदीच्या भांड्यात मुलांना जेवू घातल्यानं मुलांच्या शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे मुल शांत राहतं आणि त्याच्या शरीरात अस्वस्थता निर्माण होत नाही. उन्हाळ्यात मुलांना चांदीच्या ग्लासमध्ये दूध पाजावं किंवा मुलांना चांदीच्या ताटात जेवू घालणं फायदेशीर ठरतं.

Advertisement

सर्दी-खोकला होत नाही – लहान मुलांमध्ये असलेल्या पित्त दोषामुळे त्यांना सतत सर्दी-खोकला होत असतो. चांदीच्या ग्लासमध्ये मुलांना पाणी पाजल्यानं ही समस्या दूर होते.

Advertisement

चांदीच्या भांड्यात जेवू घातल्यानं मुलं आजारी पडत नाही आणि स्वस्थ राहतात. चांदीमध्ये काही असे तत्त्व असतात जे खाण्यात मिसळतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणूनच मुलांना चांदीच्या भांड्यात जेवू घालणं फायदेशीर होत असतं.

Advertisement
Advertisement