Take a fresh look at your lifestyle.

ताजमहाल पूर्वी शिव मंदिर होतं, आणि लवकरच ताजमहालचं नाव बदलून ‘राम महाल’ होणार; भाजप आमदाराचा दावा

महाअपडेट टीम, 13 मार्च 2021 :- ताज महाल ही वास्तू पूर्वीच्या काळी शंकराचं मंदिर होतं.त्यामुळे ताज महालाचं लवकरचं नामकरण राम महाल करण्यात येणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल, असा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केला आहे.

Advertisement

संबंधित भाजपच्या आमदाराचं नाव सुरेंद्र सिंह असून ते उत्तर प्रदेशातील बैरिया मतदार संघातून भाजपचे निर्वाचित आमदार आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

Advertisement

त्यांनी यावेळी म्हटलं की, ताज महाल ही वास्तू पूर्वी शंकराचं मंदिर होतं. त्यामुळे लवकरचं ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

Advertisement

“शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत अवतरले आहेत. समर्थ गुरु रामदासांनी ज्याप्रमाणे भारताला शिवाजी दिला, त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिलं आहे.” ताज महालचं नामकरण कृष्णा महाल किंवा राम महाल करावं, अशी मागणी अलीकडेच सुरेंद्र सिंह यांनी केली होती. यानंतर त्यांनी पून्हा एकदा याचीच री ओढली आहे.

Advertisement

देशात भारतीय जनता पक्षाची,सत्ता स्थापन झाल्यापासून देशातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि शहरांच्या नामकरणाचा सपाटाच लावला असून आता त्यांचा मोर्चा हा ताज महालकडं वळला आहे. दोनच दिवसांपूर्वी आग्रातील ताज महाल परिसरात हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी येथील लोकांना प्रार्थना म्हणायला लावली होती.

Advertisement

याप्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजं असताना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं खळबळजनक दावा केला आहे. लवकरत ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement