Take a fresh look at your lifestyle.

MPSC विद्यार्थ्यांना दिलासा, अखेर परीक्षेची तारीख ठरली

महाअपडेट टीम, 12 मार्च 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षेची नवी अखेर तारीख ठरली आहे. ही परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. एमपीएससी पूर्वपरीक्षा स्थगित केल्यानंतर राज्यभर संतापाचा गुरुवारी उद्रेक झाला होता. गाव-खेड्यांतून शहरांमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आहे.

Advertisement

तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 14 मार्च, 2021 रोजी नियोजित केलेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा सरकारच्या विनंतीनंतर कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी अचानक जाहीर केला.

Advertisement

आतापर्यंत तब्बल पाच वेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी तब्बल 2 लाख 62 हजार विद्यार्थ्यानी नोंदणी केली आहे. परीक्षा तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा एसएमएस येऊन पडताच हे सारे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले. पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरही उतरल्याने आंदोलनाला वेगळं वळणं लागलं होत.

Advertisement

एमपीएसी परीक्षेचे ऍडमिट कार्ड जारी झालंय, मार्गदर्शक सूचनाही आल्या असताना आयत्या वेळी परीक्षा स्थगित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement
Advertisement