Take a fresh look at your lifestyle.

Corona Vaccination : दोनदा कोविडची लस घेऊनही दोन आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 12 मार्च 2021 :- कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले; परंतुकोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

Advertisement

परंतु कोरोना काळात जिल्हा शल्य चिकित्सकांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर संपूर्ण जिल्ह्याचा आरोग्याचा डोलारा असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले तसेच जिल्हा परिषदेचे डीएचओ. विवेक खतगावकर तसेच समन्वयक डॉ. संतोष कड़ले हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तिघांनी देखील कोरोनाच्या प्रचलित लसीचे दोन डोस पूर्ण केले होते.  त्यानंतरही कोरोनाने यांना गाठल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

या या अधिकाऱ्यांना सतत क्षेत्रभेटी, बैठका, कंटेन्मेंट झोनचा आढावा, आदी कामे करावी लागतात. दिवसभरात अनेकांशी संपर्क होत असल्याने जिल्हा परिषदेच्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वॅबचे नमुने दिले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

Advertisement

अहमदनगर मध्येही झालीये पुनरावृत्ती :- साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यांनी कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची बाधा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Advertisement