महाअपडेट टीम, 12 मार्च 2021 :- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावेळी न्यायालयानं तिच्या विरोधात चक्क अटक वॉरंट बजावलं आहे. कंगनानं सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर गीतकार जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती.
त्यामुळे अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटलं होतं.
त्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावलं. आता कंगनानं देखील अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल झालेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी कंगनाने सत्र न्यायालयात दिलेल्या जामीन वॉरंटला आव्हान दिले आहे. बुधवारी दाखल झालेल्या याचिकेवर 15 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे कंगनाच्या वकिलांनी सांगितले आहे.