Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, कोरोनामुळे परीक्षेवर स्थगिती

महाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ( MPSC) 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ( MPSC) आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.परंतु प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत काहीही सांगण्यात आलेले नाहीये.

Advertisement

आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

Advertisement
Advertisement