Take a fresh look at your lifestyle.

नवी पेठेत MPSC विद्यार्थ्यांचा उद्रेक, गोपीचंद पडळकरांची एन्ट्री, रस्त्यावर आडवं झोपून जोरदार घोषणाबाजी

महाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाविरोधात एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले असून, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील नवी पेठ, शास्त्री रोड परिसरात ठिय्या आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेतली आहे. 

Advertisement

गोपीचंद पडळकर हे रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले आहे. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे पडळकर यांनी म्हटले आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले, पुण्यात राहण्याचा या विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च जवळपास 7000 रुपये इतका आहे..यामुळे आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

Advertisement

आतापर्यंत UPSC, बँकिंग आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आरोग्य विभागाची भरती पक्रियाही पार पडली. मग कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकार एमपीएससीची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

Advertisement

सरकारने हा निर्णयावर अधिवेशन सुरु असतानाच हा चर्चा केली नाही ! भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागली तरी चालतील पण MPSC ची परीक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंडळींनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement