Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : तब्बल शंभर कंपन्या विकून मोदी सरकार मिळवणार 5 लाख कोटी, पुढील ४ वर्षात होणार विक्री !

महाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :- देशात खासगीकरणाचे वारे जोरात वाहू लागले असून आगामी काळात सरकारी संपत्ती विकून पाच लाख कोटी रुपये जमविले जाणार आहेत. विक्री केल्या जाऊ शकणाऱ्या सुमारे शंभर मालमत्तांची यादीही मोदी सरकारने तयार केल्याची माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. पुढील चार वर्षाच्या काळात खाजगीकरणाची ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Advertisement

अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर्सवर नेण्यासाठी केंद्र सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. महत्त्वाचे म्हणजे खासगीकरणावर सरकारचा सर्वाधिक भर आहे. याच अनुषंगाने पुढील चार वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे 5 लाख कोटी रुपये जमविले जाणार आहेत.

Advertisement

या सरकारी संपत्तीत ठिकठिकाणचे टोल रोड, बंदरे, क्रूज टर्मिनल, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर, तेल आणि नैसर्गिक वायू पाइपलाइन, ट्रान्समिशन टॉवर, रेल्वे स्थानके, क्रीडा मैदाने, माउंटेन रेल्वे, ऑपरेशनल मेट्रो सेक्शन, वेअरहाउसेस तसेच कमर्शि‍यल कॉम्प्लेक्सेस यांचा समावेश आहे.

Advertisement

मोनेटाइजेशनसंदर्भात अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत लोकसंपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) विभिन्न मंत्रालये तसेच राज्य सरकाराना खाजगीकरणाच्या कामाला वेग द्यावा, असे आवाहन केले होते.

Advertisement

कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था गेल्यावर्षी गोत्यात गेली होती. मात्र आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. खाजगी केल्या जाऊ शकणाऱ्या संपत्तीची ओळख पटविण्याच्या कामाला चालना द्यावी, असे नीती आयोगाकडून बहुतांश मंत्रालयाना वारंवार सांगितले जात आहे. विभिन्न मंत्रालयांच्या अखत्यारीतील तसेच पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसकडील 31 महत्वपूर्ण संपत्तीची यादी सरकारकडे तयार आहे.

Advertisement
Advertisement