Take a fresh look at your lifestyle.

MPSC विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी काँग्रेस रस्त्यावर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेंनी काढला मोर्चा

महाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :- अवघ्या दोन दिवसांवर आलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने या निर्णयाचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत.प्रत्येक शहरात एमपीएससी विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या निर्णयाचा युवक काँग्रेसने निषेध केला आहे. 

Advertisement

या पार्श्वभूमीवर ‘राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून निर्णयाचा फेरविचार करावा,’ अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून नगरमध्ये शहर काँग्रेसच्या पुढाकारातून दिल्ली गेट येथे मोर्चा काढण्यात आला आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या युवक शाखेनेही उमेदवारांची बाजू घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष तांबे यांनी या निर्णयाचा निषेध करून म्हटले आहे, ‘एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Advertisement

Advertisement

आधीच करोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. करोनाचे संकट मोठे आहे. मात्र, दोन-तीन दिवस आधी निर्णय घेणे चुकीचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून घरापासून दूर राहून हे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत परीक्षेची चातकाप्रमाणे वाट पहात असतात. या निर्णयामुळे उमेदवारांच्या तयारीवर पाणी पडले आहे. राज्य सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून हा निर्णय मागे घ्यावा,’ असेही तांबे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement