Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : नागपुरात लॉकडाऊनची घोषणा, ‘ह्या’ तारखेपर्यंत कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद?

महाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :– गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. आता नागपुर शहरातही 15 ते 21 मार्चपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. पालक नितीन राऊत यांनी याविषयी घोषणा केली आहे.

Advertisement

कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्यभरातील अनेक शहरांमध्ये निर्बंध लावले जात आहे.त्यात आता नागपुरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. “नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

Advertisement

नितीन राऊत यांनी सांगितले की, क्वारंटाइन सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असून नागपूर शहरामध्ये लक्ष्मीनगर, धरमपेठ हॉटस्पॉट असल्याने पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.यासोबतच शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मास्क न घालणाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई करण्यात येईल. 10 मार्चला 1700 पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचर रुग्ण वाढीस लागले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

काय सुरू :-  लॉकडाउनमध्ये उद्योग सुरू राहतील
वैद्यकीय सेवा, माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र दाखवावे लागेल
माध्यम प्रतिनीधींना अपील, आरटीपीसीआर करा, निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवा
दारु विक्री दुकाने बंद, ऑनलाइन विक्री सुरू
खाद्य पदार्थांच्या सेवा सुरू
लसिकरण सुरू
अत्यावश्यक सेवेत बँक, पोस्ट, भाजीपाला, दुग्ध अंडी मास सुरू
चष्म्यांची दुकाने सुद्धा सुरू राहतील
सरकारी कार्यालयांमध्ये 25 टक्के कर्मचारी
आर्थिक लेखा संबंधित काम असल्यास पूर्ण क्षमतेने परवानगी

Advertisement

काय बंद :-  दारुची दुकाने बंद
शाळा, महाविद्यालये बंद
खासगी कार्यालये पूर्णपणे बंद
कडक संचारबंदी राहील

Advertisement
Advertisement