Take a fresh look at your lifestyle.

विश्वास नांगरे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, अर्ध्या तासांच्या भेटीत काय घडलं ?

महाअपडेट टीम, 10 मार्च 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण कथित आत्महत्या, मोहन डेलकर, मनसुख हिरेन आणि यांची आत्महत्या अशी प्रकरणं गाजत आहेत. विरोधकांनीही या दोन्ही प्रकरणावरून ठाकरे सरकारवरला विरोधकांनी घेरले आहे.

Advertisement

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असून मनसुख हिरन प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली आहे. या दोघांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे सध्या राज्यात गाजत असलेल्या डेलकर, मनसुख हिरन आणि वाझे प्रकरणावर चर्चा झाली आहे. त्याच प्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. याप्रकरणावरही दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके भरलेली कार सापडणे आणि त्यानंतर मनसुख हिरन यांचा मृत्यू होणे आणि त्यात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होणे यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.या सर्व प्रकरणावरून शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. पण शरद पवार रात्री उशिरा भेटणार की उद्या दिवसभरात मुख्यमंत्र्यांना भेटणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Advertisement