Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत, उपचारासाठी दाखल

महाअपडेट टीम, 10 मार्च 2021 :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आहे अज्ञातांनी हा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्याच्या पायाला दुखापत झाली असून नंदीग्रामहून त्यांना कोलकाता येथे नेले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, तिच्यावर 4 लोकांनी लोकांनी हल्ला केला. जेव्हा त्या त्यांच्या कारजवळ होती तेव्हा हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत कारमध्ये बसवलं. त्या म्हणाला की, पायाला खूप दुखापत झाली असून खूप वेदना होत आहे.प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलं.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला.

Advertisement

यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना आता तातडीने कोलकात्याला आणलं जात आहे. कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement