Take a fresh look at your lifestyle.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा भयंकर अंत, लाथाबुक्क्याने, कमरेच्या पट्टयाने मारहाण करत पतीने…

महाअपडेट टीम, 10 मार्च 2021 :- प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा लग्नानंतर अवघ्या सहा महिने झालेले असताना पतीने खून केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली आहे. या घटनेने कर्जत तालुका तसंच मिरजगाव परिसर हादरला आहे. महिला दिनीदिवशी महिलेचा खून झाल्याने तालुक्यातील महिलांच्यामध्ये संतापाची लाट आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे राहणारे प्रेमीयुगलाने सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. दि. 8 मार्चला मिरजगाव येथील शंकर किशोर साळवे आणि पत्नी नेहा यांच्यात दुपारी कडाक्याचे भांडण झाले. यात किशोर याने नेहाला लाथाबुक्क्याने तसंच कमरेच्या पट्टयाने मारहाण करून भिंतीवर डोके आपटले होते.

Advertisement

यावेळी नेहाची बहीण व लहान भाऊ नेहाच्या घरी आले होते. त्यांच्या समोरच या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण सुरू झाले यामुळे ते आपले घर गाठण्यासाठी निघाले असता त्यांना शंकर साळवेचा वाटेतच फोन आला की नेहाने गळफास घेतला असून, तिला दवाखान्यात आणले आहे. परंतु बहीण-भाऊ पोहोचण्याआधी नेहाचा मृत्यू झाला होता.

Advertisement

पोलिस उप निरीक्षक अमरजित मोरे यांनी तातडीने तेथे भेट दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन अहवालात वैद्यकीय प्रमाणपत्रात डोक्यास अंतर्गत मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने मयताची बहीण दिक्षा ठोसर रा.नवसरी गुजरात यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली असून पुढील तपास चालू आहे.

Advertisement
Advertisement