Take a fresh look at your lifestyle.

रोज सकाळी फक्त अर्धा तास वेळ देऊन रनिंग केल्यास शरीरात होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे

महाअपडेट टीम, 10 मार्च 2021 :-  तुम्ही कधी ना कधी असा विचार नक्की केला असाल की, मला सुद्धा आत्ता सकाळी रनिंग करायला हवी.याच कारण म्हणजे आजच्या युगात सकाळी रनिंग करणं हे खूप फायद्याचं आहे. आणि आपल्याला हे माहित असून सुद्धा आपण सकाळी रनिंग करत नाही.त्याच्यामुळेच कालांतराने आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. तुम्ही पाहिलेच असेल की, लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी विविध कार्य करत असतात. 

Advertisement

काही जण सकाळी रनिंग करायला जातात, काही जण व्यायाम करतात, काहीजण योगा करतात तर काही जण सकाळी फिरायला जातात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार रोज सकाळी रनिंग केल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब, साखर, ताण इत्यादी अनेक आजारांना हे प्रतिबंधित करते. नियमितपणे रनिंग केल्याने आपले मन शांत देखील होते. रनिंग करत असताना आपल्याला असे वाटते की आपण ध्यान करीत आहोत.

Advertisement

अभ्यासानुसार 1970 मध्ये 66% लोक चालायचे. पण आणि आजच्या काळामध्ये ती केवळ 13% वर आली आहे. यामुळे,आपल्याला वाढत्या तंत्रज्ञानामुळे आळशी माणसे कशी बनले आहेत याची कल्पना येते. म्हणूनच आता तुम्हालाही रनिंगचे महत्त्व समजण्यास मदत होईल.

Advertisement

सकाळी रनिंग केल्याचे फायदे :-

Advertisement

वाढलेले वजन कमी होते :- रनिंगमुळे वजन कमी होते. रनिंगमुळे शरीरातून अतिरिक्त कॅलरी कमी होते. हे आपल्या शरीरातील जादा चरबी कमी करते, ज्यामुळे आपण फिट दिसता.

Advertisement

स्टॅमिना वाढवतो :- रनिंगमुळे एखाद्या व्यक्तीची तग धरण्याची क्षमता बर्‍याच प्रमाणात वाढवते. तो सहजपणे बर्‍याच समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणूनच कठोर परिश्रम केल्याने आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

Advertisement

झोप चांगली येते :- रनिंगमुळे आपल्याला शांत झोप लागते . हे याच्यामुळे होते कि, आपण सकाळी रनिंग केल्यामुळे आपला ताणतणाव निघून जातो आणि आपल्याला एकदम शांत झोप लागते.

Advertisement

उच्च रक्तदाब नियंत्रित होतो :- रनिंगमुळे आपला उच्च रक्तदाब नियंत्रित केला जातो. हे आपल्याला रोगांपासून दूर ठेवते.

Advertisement

ऊर्जा वाढवते :- रनिंगमुळे शरीरात उर्जा देखील वाढते. यामुळे आपल्या शरीराची उर्जा पातळी खूप जास्त होते . ज्यामुळे आपण दिवसभर आपले काम थकल्याशिवाय करू शकतो.

Advertisement

अधिक वर्षे जगतो. :- जर आपण नियमितपणे रनिंग केली तर बरेच रोग आपल्या शरीरापासून दूर राहतात. यामुळे आपले वय वाढते, म्हणजेच आपण अधिक वर्षे जगतो.

Advertisement

पचन क्रिया सुधारते :- नियमितपणे रनिंगमुळे आपली पचन क्रिया सुधारते. यामुळे बर्‍याचदा शरीरातील वायू कमी होतो. जे आपले पोट देखील साफ ठेवतो.

Advertisement

हृदय निरोगी राहते :- रनिंगमुळे हृदय निरोगी राहते. कारण यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हृदयाचे कार्य सुलभ होते.

Advertisement
Advertisement