Take a fresh look at your lifestyle.

3 फुट उंचीचा हा तरुण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला, ‘सर प्लिज माझं लग्न करा, मला… ‘

महाअपडेट टीम, 10 मार्च 2021 :- एक हिंदीत म्हण आहे, ‘शादी का लड्डू जो खाए, वो पछताए और जो न खाए वो भी पछताए…’ असे असले तरीही काही लोकं ते खाण्यास उत्सुक असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील शामली येथून समोर आली आहे. या ठिकाणी अविवाहित असलेला एक तरुण आपलं लग्न होण्यासाठी चक्क कोतवाली पोलिस स्टेशन पोलिसांकडे विनवणी करत असल्याचे पाहायला मिळालंय. त्याचं नाव अजीम मन्सुरी असून वय साधारण 26 वर्ष आहे. आणि उंची फक्त 3 फूट.

Advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, त्याला पाच भावंडे आहेत, सरांची उंची जास्त असून अझिमची उंची कमी राहिली आहे, कदाचित हेच कारण त्याच्या लग्नाला अडथळा बनलं आहे.लग्न होण्यासाठी अझीम खूप दिवसांपासून प्रयत्न करत असून अजून त्याच्या प्रयत्नाला यश आले नाहीये.

Advertisement

म्हणाला… जर माझं लग्न झालं तर पत्नीला हनीमूनवर गोव्याला घेऊन जाईल

Advertisement

अझीम मन्सुरीने आपल्या वेदनेचे वर्णन केले आहे आणि त्याने म्हटले आहे की, मी माझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न केले आहेत, परंतु अद्याप अल्लाहने माझ्या प्रार्थना स्वीकारल्या नाहीत. जर अल्ह्हाला माझी दयामया आलीच आणि जर माझे लग्न झाले तर मी माझ्या पत्नीला हनिमूनसाठी गोवा तसेच तिला कुल्लू मनाली, मसूरी अशा अनेक हिलस्टेशन्सवर घेऊन जाईल.

Advertisement

त्यानं तर जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्र्यांलाही लिहिलंय पत्र

Advertisement

अझीमच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांना आपले लग्न लावून देण्यासाठी पत्र लिहिले आहे, तरीही अद्याप लग्नासाठी त्यांना मुलगी सापडली नाही, सर्व प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी न मिळाल्यामुळे अझीम फारच निराश आहे

Advertisement
Advertisement