Take a fresh look at your lifestyle.

रणबीर कपूरला कोरोनाची लागण ? काका रणधीर म्हणाले…

महाअपडेट टीम, 09 मार्च 2021 :– कपूर कुटुंबाच्या चिंतेत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अर्जुन कपूर, वरुण धवन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, यासारखे अनेक सेलेब्रिटी या कोरोना विषाणूच्या विळख्यातुन सावरले असताना कपूर कुटुंबाची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूर सध्या आजारी आहे. आई नीतू कपूरनंतर आता रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement

रणबीरच्या आजारपणाबद्दलची बातमी समोर आल्यानंतर रणधीर कपूर यांनी याबद्दलची खरी माहिती दिली आहे. रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सुरुवातीला हो म्हटले आणि मग ते म्हणाले की, ‘रणबीरची तब्येत ठीक नाही, पण त्याला कोरोना झालाय की नाही, हे माहित नाही. मी सध्या शहराबाहेर आहे.

Advertisement

याआधी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याआधी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.

Advertisement

कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे, मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

Advertisement
Advertisement