Take a fresh look at your lifestyle.

महाबळेश्वरात गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा, मुख्याध्यापकानेच केला दहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार

महाअपडेट टीम,09 मार्च 2021 :-  महाबळेश्वरामध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. देशभर जागतिक महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नराधम मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड ता महाबळेश्वर) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे. याच शाळेत दहावी इयत्तेत शिकत असलेल्या जवळच्या नात्यातील १५ वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत अत्याचार केला. नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे.  या बाबत एका जागरूक नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर तक्रार दाखल केली होती.

Advertisement

महाराष्ट्र पोलिसांच्या या हेल्पलाईन वरून आलेल्या तक्रारीची गंभिर दखल घेण्यात आली. महाबळेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करित होते.आरोपी व पिडीत विदयार्थीनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधुन काढला. पिडीत मुलीला महाबळेश्वर पोलिसांनी विश्वासात घेतल्या नंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या आत्याचाराचा पाढा वाचला.

Advertisement

यांनतर पोलिसांनी नराधम प्राचार्याच्या मुसक्या आवळल्या. मुख्याध्यापकाने पोलिसांजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. महाबळेश्वर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून त्याच्यावर बालकांचे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement